वेदना

'अबोल', 'अस्पर्शी' शब्द आहेत अनोळखी साऱ्याच सखे मांडतो, वेदना मनातल्याही

संध्या

ती निवांत संध्या तो शुभ्र चंद्र ते नि:शब्द भाव त्या रवंथ आठवणी

चूक

वेडी माझी पावलं अविरत तिच्याकडे वळत होती इतरांच्या नजरेत मात्र का कुणास ठाऊक चुकत होती...

चंद्र

आकाशातला चंद्र जणू खुणावतो आहे काहीतरी... सतत त्याच्याकडे पहावंसं वाटू लागलंय वेळी-अवेळी...

चंद्रप्रेम

चंद्राला प्रेमाची उपमा काय दिली तोही आकर्षित करू लागला संध्याकाळ झाली नाही की या डोळ्यांना हवाहवासा झाला

तुझ्याविना

आजन्म तुझ्या आठवणींचं संचित घेऊन मनी... जगत राहील तुझ्याविना तुझ्याचसाठी मीही.....

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
Get started