व्यथा

व्यथा माझ्या मनाची, माझ्याच उरी राहिली न्हेता तिजला इतरांकडे, परिहास सोसूनी आली सहन न होता दुख: तिचे, जोपासले तिला अंतरी बदलत्या माझ्या वागण्याकडे, लोकांची नजर वळली उद्भवलेल्या प्रश्नचिन्हांवर उत्तर नव्हते मनी, पुर्विवत वागणे आता कसे आणू तरी........?

एकाकीपणाचा सोबती

बसलो असता विचाराधीन, अवतरली माझीच प्रतिमा नवल नाही, आश्चर्य नाही, मी बसलो होतो तसाच. मानभावी हास्य लेवूनी विचारले त्याने मला, "कसला विचार करतो आहेस, सांगणार नाहीस मला ?" मंद फक्त हसू घेऊनी मी वळलो त्याच्याकडे, चिडवण्यास मग मला, त्याने टाकले पाऊल पुढे "आहे कसली चिन्ता वा कुणास भेटण्याची आस ? तसे काही असेल तर, सांगूनच... Continue Reading →

परिभाषा

सूर माझ्याच मनीचे उमजले नाही मला, विचारता अर्थ कुणी, मी सांगू तरी कसा ? दाटून आली वर्दळ अनंत विचारांची, अर्थ काही कळेना जुडलेला या सूरांशी कदाचित काही भावनांना नसते काही परिभाषा, दडले असेल उत्तर कुठेतरी पण गरज नाही मला…

Ecstasy

Once, I spread my hands and closed my eyes Imagining myself floating in the skies I felt myself in the middle of the sea I felt myself a mad escapee I felt myself roaming on the beach I felt myself beyond anyone's reach I felt myself burning in the fire I felt myself rising even... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
Get started